Crime News: जुन्या वादातून कार पेटवली; सोमठाणे गावातील घटना

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Crime News
जुन्या वादातून कार पेटवली; सोमठाणे गावातील घटना Pudhari
Published on
Updated on

Pathardi News: जुन्या वादातून पेट्रोल टाकून चारचाकी गाडी पेटून दिल्याची घटना तालुक्यातील सोमठाणे गावात घडली असून, या आगीमध्ये गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमठाणे येथे जुन्या वादातून घरासमोर लावलेली चारचाकी पेट्रोलने पेटवून देऊन महिलांना शिवीगाळ करण्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री 10 वा. घडला. याबाबत संगीता काकडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता विष्णू काकडे यांचा मुलगा रामेश्वर काकडे व गावातील तरुण संतोष माणिक खवले यांच्यात जुना वाद होता. हाच वादाचा मुद्दा ठरत गाडी जाळल्याचा प्रकार घडला आहे.शुक्रवारी रात्री 10 वा. संतोष खवले, अमोल खवले, राहुल खवले व दोन अनोळखी इसमांनी काकडे यांच्या घरी येऊन रामेश्वर कुठे असल्याचे विचारले. त्या वेळी रामेश्वर हा बाहेर गेल्याचे त्याच्या आईने सांगितले.

या वेळी संतोष खवले याने तो गावात लई शहाणा झाला आहे असे सांगत रामेश्वर काकडे यांच्या आईस व पत्नीस शिवीगाळ करत यातील वरील लोकांनी काकडे यांच्या घरासमोर असलेल्या शेडमधील चारचाकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. यामध्ये गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे. तसेच जाता जाता यातील संशयित आरोपींनी पोलिसांत गुन्हा दाखल केला, तर तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार देऊ, अशी धमकी दिली.

संगीता काकडे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. 21) पहाटे 3 वाजता संतोष खवले, अमोल खवले, राहुल खवले व दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी फरार असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी काकडे यांनी केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी अण्णा पवार पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news