Akole municipality: अकोले नगरपालिकेत कोट्यवधींची वाहने धूळखात; नागरिकांमधून संताप

वाहनांचा वापरच होत नसल्याने व देखभालीअभावी ही वाहने भंगारात जमा होण्याची वेळ
Akole municipality
अकोल्यात कोट्यवधींची वाहने धूळखात Pudhari
Published on
Updated on

अकोले : येथील नगरपंचायत प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये निधी खर्च करून विविध वाहनांची खरेदी करण्यात आली. त्यात अग्निशमन वाहन, ट्रॅक्टर आणि तीन ते चार घंटागाड्यांचा समावेश होता. मात्र, या वाहनांचा वापरच होत नसल्याने व देखभालीअभावी ही वाहने भंगारात जमा होण्याची वेळ आली आहे. (Latest Ahilyanagar News)

शासनाने 23 एप्रिल 2015 च्या निर्णयाद्वारे अकोले ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर केले. नगरपंचायत अंतर्गत माळीझाप, गुरवझाप, शेकईवाडी, शेतकीफार्म, कारखाना रोड, कमान वेस आदि परिसराचा समावेश आहे. तसेच अकोले शहरातील वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार 19 हजार 800 एवढी लोकसंख्या आहे. यात आता वृद्धी झालेली आहे. आदिवासी तालुका असलेल्या अकोले तालुक्यातील नगरपंचायत म्हणून ओळख आहे.

Akole municipality
Jamkhed public hearing: जामखेडच्या आमसभेमध्ये तक्रारींचा पाऊस; मुजोर अधिकार्‍यांचे आमदार पवारांनी उपटले कान

नगरपंचायतची निर्मिती होऊन 10 वर्षे उलटली. मात्र अजूनही नवीन इमारत तर सोडाच कार्यालय भवनासाठी जागा देखील उपलब्ध झाली नाही. परिणामी कोट्यवधी रुपये निधीतून खरेदी केलेली वाहने पाणी पुरवठा आवारात धूळखात आहेत. विशेष म्हणजे, यातील काही वाहने नवीन असून बंद अवस्थेत असल्याने लवकरच भंगारात जमा करण्याची वेळ येणार आहे.तसेच वाहने पावसात भिजत असल्याने मशीनसह टायरची दयनीय अवस्था झालेली आहे.

अकोल्यात डांबरीकरण, गटारी, काँक्रीटीकरण रस्ते, मोरी बांधकाम बर्‍यापैकी झाले असले तरी बहुतांश ठिकाणी कामाची दुरावस्था होताना दिसत आहे.

Akole municipality
Solar Pump Scam: सौर योजनेत होतेय शेतकर्‍यांची लूट!

बसस्थानक, पंचायत समिती, शाहुनगर, शेतकरी फार्म, कमानवेस, गुरवझाप, कारखाना रोड, कोल्हार - घोटी रस्ता परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. कोट्यवधींच्या निधीतून दुहेरी नळ योजना राबवून देखील विविध प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मागील एक वर्षापासून पारदर्शकतेने घनकचर्‍याचे व्यवस्थापन होत नसल्याने शहरात घाण पसरलेली दिसून येते.

शववाहिनीही प्रशासनाकडून दुर्लक्षित

अकोले शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. दि.7 मार्च 2015 मध्ये अकोले नगरपंचायत झाली. तसेच अकोले नगरपंचायतीला अग्निशमन वाहन 2024 मध्ये लोकार्पण केले आहे, मात्र प्रशिक्षित कर्मचारी नाही. केमिकल फायबर, पेट्रोलियम फायर आदी सुविधा आहे. राजूर, कोतूळ, समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर मृतदेह नेण्यासाठी अकोले नगरपंचायतीकडे राज्य सरकार आरोग्य विभागाकडून शववाहिनी सुपूर्त केली असली तरी देखील नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे शववाहिनी धुळखात पडली आहे.

Akole municipality
Water Supply Crisis: नेवाशात पाण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

नवीन निधी कशासाठी हवाय : शेटे

गुरवझापमधील चोथवे किराणा ते दळवी वस्ती, निमंत्रण हॉटेल जवळील व लेंडे सरांच्या घराजवळील रस्त्याचे डांबरीकरण अलीकडेच झाले आहे. काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले. अकोले नगरपंचायतीची कामे निकृष्ट दर्जाची झालेले आहेत. काही ठिकाणी कामांची गरज नसताना कामे केली आहेत व केली जात आहेत. त्यामुळे असे असताना ‘मलिदा’ मिळविण्यासाठी नवीन निधी हवाय का, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन शेटे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news