Ahilyanagar ST Employee Kidnap: एसटी कर्मचाऱ्याचे अपहरण करून लूट; कोतवाली पोलिसांची २४ तासांत दोघांना बेड्या

निर्जनस्थळी नेऊन मारहाण; मोबाईल व ‘फोन पे’चा पासवर्ड घेऊन ७,१०० रुपये केले ट्रान्सफर
Ahilyanagar ST Employee Kidnap
Ahilyanagar ST Employee KidnapPudhari
Published on
Updated on

नगर: शहरातील पुणे बसस्थानक परिसरातून एसटी महामंडळात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रवाशाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेत मारहाण करूत लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत सावेडी परिसरातून बेड्या ठोकल्या.

Ahilyanagar ST Employee Kidnap
Shirur Bypass Accident: शिरूर बायपासवरील बेकायदा दुभाजक संसदेत गाजला; खासदार अमोल कोल्हेंचे NHAIला कडक निर्देश

त्यांच्याकडून लुटलेली रोकड, मोबाईल व दुचाकी असा ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. अभिषेक सुनील शिरसाठ (वय २३, रा. अंबर अपार्टमेंट, सावेडी रोड, अहिल्यानगर), अनुष शांतवन धीवर (रा. संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट, सावेडी, अहिल्यानगर) असे आरोपींची नावे आहेत.

Ahilyanagar ST Employee Kidnap
Sangamner Solar Project Protest: एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्पाला विरोध; संगमनेरमध्ये १० ते १२ आंदोलकांना ताब्यात

१८ ऑगस्ट रोजी फिर्यादी (प्रवासी) हे पुणे बसस्थानक परिसरात असताना आरोपींनी त्यांना गाठले. आरोपींनी फिर्यादीस बुरुडगाव रोड येथील निर्जनस्थळी उचलून नेले. तेथे त्यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी मोबाईल व 'फोन पे'चा पासवर्ड बळजबरीने मिळवून फिर्यादीच्या खात्यावरून ७,१०० रुपये अनोळखी खात्यावर ट्रान्सफर केले आणि फिर्यादीला सोडून पळ काढला. याप्रकरणी कोतवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Ahilyanagar ST Employee Kidnap
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात; प्रारूप मतदारयादीत दिग्गजांचे ठराव

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी तपासाची चक्रे फिरविली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाआधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अभिषेक शिरसाठ, अनुष धीवर अशी नावे सांगितली आणि आरोपी प्रवीण शेजवळ (रा. कोंढवड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोपेड दुचाकी, मोबाईल फोन, रोकड ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक दीपक मेढे करीत आहेत.

Ahilyanagar ST Employee Kidnap
Ahilyanagar Mava Factory Raid: सावेडीत माव्याचा कारखाना उद्ध्वस्त; एलसीबीचा छापा, एकाला अटक तर साथीदार फरार

ही कारवाई उपनिरीक्षक गणेश देशमुख, दीपक मेढे, पोलिस अंमलदार बाळकृष्ण दौड, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबिर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, शिरीष तरटे, सुरज कदम, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे, अमोल गाडे, सचिन लोळगे, महेश पवार, रमेश शिंदे, संकेत धीवर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news