शशिकांत भालेकर
पारनेर: जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून विद्यमान संचालिका गीतांजली शेळके यांच्या उमेदवारीसोबतच खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, शिवसेना नेते सुजित झावरे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.
सहकारी सेवा संस्था मतदारसंघ 106 मतदार, बिगरशेती मतदारसंघ 98 मतदार, शेतीपूरक सभासद मतदारसंघ109 मतदार आहेत. त्यापैकी अद्याप 46 ठराव झाले आहेत.
यात पारनेरला मागच्या निवडणुकीत सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून एक व सेवा संस्था बिगरशेती मतदारसंघातून एक अशा दोन जागा मिळाल्या होत्या. त्यात बिगरशेती मतदारसंघातून प्रशांत गायकवाड निवडून गेले होते.
सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून पारनेरमधून यापूर्वी माजी अध्यक्ष कै. ॲड. उदय शेळके निवडून गेले होते. त्यांनी माजी आमदार विजय औटी समर्थक शिवसेनेच्या रामदास भोसले यांचा पराभव केला. त्यांच्या रूपाने पारनेरला अध्यक्षपदाची संधी मिळाली.
त्यांना त्यावेळी तत्कालीन आमदार लंके यांचे पाठबळ मिळाले होते.मात्र त्यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांना बिनविरोध संचालकपदाची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना सत्ताधारी व विरोधी गटाकडून मदत मिळाली; मात्र आता राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे पुन्हा त्यांना सर्वपक्षीय गट एकत्रित येऊन उमेदवारीसाठी पाठिंबा देतील का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सध्या त्या गावपातळीवर या प्रक्रियेसाठी सक्रिय झाल्या आहेत.
खासदार नीलेश लंके यांनी आमदार असताना व खासदार झाल्यानंतर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले. बऱ्याचशा सेवा संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी गावपातळीवर ठरावासाठी प्रयत्न सुरू केले असून, पारनेरमधील उमेदवारीबाबत ते कोणता निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आमदार काशिनाथ दाते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून बेरजेचे राजकारण केले आहे. त्यात अनेक कार्यकर्ते जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र असे असले तरीही तालुक्यातील सेवा संस्था मतदार त्यांना कितपत साथ देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
तसेच विद्यमान संचालक प्रशांत गायकवाड हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आ.दाते हे सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे ते भाजप-शिवसेना एकत्रीत विचार करतील, अशी चर्चा आहे. गीतांजली शेळके यांना पाठिंबा द्यायचा की स्वतःचा उमेदवार उभा करायचा यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होईल.
शिवसेना नेते सुजित झावरे पाटील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तरुण नेतृत्व असावे, यासाठी आग्रही आहेत. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला पारनेरची जागा मिळाली, तर झावरे स्वतः किंवा त्यांचे जवळचे कार्यकर्ते मैदानात उतरू शकतात, अशी शक्यता आहे.
इच्छुकांची नावे चर्चेत!
पारनेरमधून जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी अनेक दिग्गजांची नावे आघाडीवर आहेत. खासदार नीलेश लंके किंवा राणी लंके यापैकी एक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ते कोणत्या सोसायटीतून ठराव घेतात, याकडे लक्ष लागले आहे. यातून, लंके गटाकडून तालुक्यातील सहकारी संस्थांवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय महानगर बँकेच्या अध्यक्ष गीतांजली शेळके, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रशांत गायकवाड, सुजित झावरे पाटील व राहुल शिंदे यांची नावेदेखील इच्छुकांच्या यादीत चर्चेत आहेत.
पळवापळवी सुरू
जिल्हा बँक ठरवासाठी संचालकांची पळवापळवी सुरू झाली असून यामध्ये मोठे अर्थकारण होत असल्याची चर्चा आहे. नुकताच पाडळी रांजणगाव येथे संचालक पळवून नेल्याबाबत फिर्याद दाखल झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
गावपातळीवर मतदानासाठी ठराव करण्याचे काम सुरू आहे. यात आजपर्यंत विकास सेवा संस्थेचे 38 व बिगरशेती मतदारसंघ 7 ठराव झाले असून सर्वच पक्षांतील नेते मंडळींकडून आपल्या गटातील कार्यकर्त्यांच्या नावे ठराव करण्यासाठी आखणी केली जात आहे दि. 16 जुलैपर्यंत ठराव मागवण्यात आले आहेत. त्यात कोणाच्या गोटात जास्त ठराव पडतात, त्यावर उमेदवारी अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.