Ahilyanagar News: मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत, धामोरी जातपंचायतीचा अजब फतवा; अंनिसची पोलिसात तक्रार

कुटुंबाला एक लाखाचा दंडही जातपंचायतीने ठोठावला
Ahilyanagar News: मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत, धामोरी जातपंचायतीचा अजब फतवा; अंनिसची पोलिसात तक्रार
Published on
Updated on

कोपरगाव : मुलीने जातीतील मुलाशी प्रेमविवाह केल्याने तिच्या संपूर्ण कुटुंबाला समाजाच्या जातपंचायतीने जातीतून बहिष्कृत केल्याचा प्रकार तालुक्यातील तालुक्यातील धामोरी येथे घडला आहे. या कुटुंबाला एक लाखाचा दंडही जातपंचायतीने ठोठावला असून, त्यातील पन्नास हजार रुपये वसूलही केले आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

धामोरी येथील या कुटुंबातील सज्ञान मुलीने तिच्या जातीतीलच एका मुलासोबाबत प्रेमविवाह केला; परंतु त्या समाजाच्या जातपंचांनी तो विवाह अमान्य केला. धामोरी येथे त्याबाबत जातपंचायत भरवून पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Ahilyanagar News: मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत, धामोरी जातपंचायतीचा अजब फतवा; अंनिसची पोलिसात तक्रार
Dhamori Caste Panchayat: मुलीच्या प्रेमविवाहामुळे कुटुंबावर जातपंचायतीचा बहिष्कार; एक लाखांचा दंड

हे कुटुंब अत्यंत गरीब असून, पालामध्ये राहत असून सुया-फण्या विकून उपजीविका करत आहे. तरीही त्यांनी पन्नास हजार रुपये जातपंचायतीला दिले. उरलेली रक्कम पीडित कुटुंब देऊ शकले नाही. त्यामुळे जातपंचांनी संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केली. त्यांच्याशी कुणीही बोलण्याचे नाही. सुख-दुःखाच्या प्रसंगात बोलवायचे नाही अन्यथा त्यांनाही दंड करून जातीबाहेर काढू, असा फतवा काढला. त्यांच्या मुलीला पण भेटू दिले जात नाही. कुटुंबाला जातपंचायतीकडून दिला जाणारा जाच, छळ कमी झाला नाही.

Ahilyanagar News: मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत, धामोरी जातपंचायतीचा अजब फतवा; अंनिसची पोलिसात तक्रार
Ahilyanagar District Bank Election: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी हालचालींना वेग

जातपंचायतीच्या अन्यायकारक निवाड्यामुळे मुलीच्या वडिलांना स्वतःच्या भावाच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आले नाही. अशा प्रकारच्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाण्यापासून या कुटुंबाला रोखण्यात आले आहे.

दरम्यान, या पीडित कुटुंबाने याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडितांसह कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले.

Ahilyanagar News: मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत, धामोरी जातपंचायतीचा अजब फतवा; अंनिसची पोलिसात तक्रार
Sangamner Traffic Congestion: संगमनेरातील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; सिग्नल असूनही बेशिस्त वाहतुकीला लगाम नाही

पीडित कुटुंबाच्या तक्रारीसह सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यान्वये जातपंचांवर गुन्हा नोंदविण्याचे निवेदन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिले. याबाबत संबंधित तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news