Ahilyanagar Extortion Case: खंडणी प्रकरणातील आरोपींना घेऊन गेलेल्या पोलिसांना महिलांचा घेराव; वैदूवाडीत शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

घरझडती व पंचनाम्यासाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की; आरोपींना पळवून नेण्याचा प्रयत्न, सात महिलांवर गुन्हा दाखल
Police
PolicePudhari
Published on
Updated on

नगर: खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना तोफखाना पोलिसांनी घटनास्थळ पंचनाम्यासाठी आज दुपारी दोरीने बांधून परिसरातून फिरवित नेले. मात्र, पोलिसांना आरोपींच्या नातेवाईक महिलांनी गराडा घालून धक्काबुक्की केली. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी गेलेल्या पोलिसांची हतबलता अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केली.

Police
Ahilyanagar Heavy Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अकोलेत सर्वाधिक पाऊस, मुळा-भंडारदरा धरणांना नवसंजीवनी

खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी नितीन शिंदे, विशाल शिंदे (रा वैदूवाडी) यांना घेऊन घर झडती आणि पंचनामा करण्याकामी आज दुपारी पोलिस पथक वैदूवाडी येथे गेले होते. दोन्ही आरोपींना दोरीने बांधून रस्त्याने फिरवित नेत होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस अंमलदार भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुमीत गवळी आदींचे पथक तैनात होते.

Police
Nevasa Ashadhi Wari: ज्ञानोबांच्या पुण्यभूमीतून आषाढी वारीला जल्लोषात प्रारंभ; नेवासाहून 'पैस' खांब पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

दरम्यान, आरोपींच्या घराजवळ पाच ते सहा महिलांनी पोलिसांना घेरले. आमच्या माणसांना का अटक केली, आमच्या घरी कशाला आलात, असे म्हणून आरडाओरड सुरू केली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. त्या महिलांनी आरोपींना घेऊन पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पथकाबरोबर एकच महिला कर्मचारी उपस्थित होत्या. अचानक सहा महिला पोलिसांच्या अंगावर आल्याने पोलिस हतबल झाले. पोलिसांनी जास्तीची महिला पोलिसांची कुमक आणून परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, यानंतर सात महिलांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news