Ahilyanagar Drug Crackdown: अहिल्यानगरची ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र; 32 गुन्हे, 59 आरोपी, 1.78 कोटींचा मुद्देमाल जप्त

६ ऑगस्टला 'ड्रग्ज फ्री अहिल्यानगर' जनजागृती रॅली; अमली पदार्थांची साखळी मोडण्यासाठी पोलिसांची व्यापक कारवाई, टाकळी ढोकेश्वरला नवीन पोलिस ठाण्यालाही मंजुरी
New SP Ahilyanagar
New SP AhilyanagarPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर पोलिस दलाने अमली पदार्थविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणारे आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात 32 गुन्हे दाखल केले असून 59 जणांना आरोपी केले आहे. 177 ग्रॅम ड्रग्स तर 640 किलो गांजा असा एकूण एक कोटी 78 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

New SP Ahilyanagar
Ahilyanagr Crime: प्रेमविवाहाला विरोध; अल्पवयीन मुलीच्या ऑनर किलिंगप्रकरणी आई-वडिलांसह आजीला जन्मठेप

ते म्हणाले, जिल्ह्याला ड्रग्जमुक्त करण्याच्या उद्देशाने येत्या गुरुवारी (दि. ६) 'अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता अहिल्यानगर येथील पोलिस मुख्यालयातून या रॅलीची सुरुवात होणार असून, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सर्वांना नशामुक्तीची शपथही दिली जाणार आहे.

New SP Ahilyanagar
Sonai Police Vehicle Checking: शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पोलिसांची कारवाई; अवैध प्रवासी वाहतुकीकडे मात्र डोळेझाक?

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात करण्यात आलेल्या अमली पदार्थ विरोधी कारवाया आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलिस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक सुदर्शन म्हणाले की, जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कारावयांची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी करावया करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परंतु, कारवाई बरोबर जनजागृती ही महत्त्वाची आहे. त्यासाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली'सह विद्यार्थी व युवकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, सायबर क्राईम, पॉक्सो, कायद्यांतर्गत असणाऱ्या कायदेशीर बाबींविषयीही विशेष जनजागृती केली जाणार आहे. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना शपथ दिली जाणार आहे. पोलीस मुख्यालयातून रॅली ची सुरुवात होऊन साधारण दोन किलोमीटर रॅली फिरवून पुन्हा पोलीस मुख्यालयात येणार आहे.

New SP Ahilyanagar
Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ९१ टक्के भरले; नगर-नाशिकच्या पावसाने गोदावरी, प्रवरा, भीमा नद्यांना पूर

"एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य" आणि "ड्रग्ज फ्री अहिल्यानगर" या संकल्पनेवर आधारित या अभियानातून "मी व्यसनमुक्त... माझं अहिल्यानगर व्यसनमुक्त!" आणि "अंमली पदार्थांना नकार... उज्ज्वल भविष्याचा स्वीकार!" असा संदेश रॅलीतून दिला जाणार आहे.

या समाज परिवर्तनाच्या लोकचळवळीत सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, वकील, पत्रकार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, शांतता समितीचे सदस्य, सर्व धर्मीय धर्मगुरू, सायकलिंग व स्पोर्ट्स संघटना, समाजसेवक आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

New SP Ahilyanagar
Nevasa Onion Market: नेवासा कांदा मार्केटची ७.५० कोटींची उलाढाल; तीन महिन्यांत ६० हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक

साखळी तोडण्याचे प्रयत्न

अहिल्यानगर शहर व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्स जप्त करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाया केल्या. या गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना अटक केली असून काहींची नावे निष्पन्न झाली आहेत. मूलतः जिल्ह्यात ड्रग्स नेमके कुठून येते ही साखळी तोडण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत, असे सुदर्शन यांनी सांगितले.

...तर बडतर्फीची कारवाई

ड्रग्सविक्रीच्या किंवा वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये कोणत्याही पोलिस ठाण्यातील कर्मचारी आढळून आल्यास किंवा कर्मचाऱ्यांचा त्यात सहभाग आढळून आल्यास थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. तसे स्पष्ट आदेश यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वरला पोलिस ठाणे मंजूर

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पोलिस ठाणे व्हावे, अशी अनेक दिवसांपासून नागरिकांसह लोकप्रतिनिधींची मागणी होती. तसा प्रस्तावही गृह विभागाकडे अनेक दिवसांपासून पाठविण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाली असून पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यानंतर पोलिस स्टेशन सुरू करण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news