Crop Damage: पिके करपली, शेतकरी संकटात! ‘तातडीने दुष्काळ जाहीर करा’; नीलेश लंके यांची मागणी

पावसाअभावी अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. करपलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी नीलेश लंके यांची मागणी.
Crop Damage
Crop DamagePudhari
Published on
Updated on

जामखेड: पावसाने दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा.

तसेच पावसाअभावी करपून व जळून गेलेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.

Crop Damage
Kukadi Project| कुकडी प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याचा कर्जत-जामखेडला फायदा: आ. पवार

खा. लंके म्हणाले, जामखेड तालुक्यात शाळेच्या नवीन खोल्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलो असताना, परिसरातील शेतशिवारातील पिकांची स्थिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. यावेळी अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपून गेल्याचे अत्यंत गंभीर चित्र दिसून आले.

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी करून बियाणे, खते, मशागत व इतर शेतीकामांवर मोठा खर्च केला आहे. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून करपलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत. मात्र, केवळ पंचनामे करून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात काहीही अर्थ नाही. पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका खासदार लंके यांनी मांडली.

शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. शेतीवरील मोठा खर्च करूनही पिके हातातून जाण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता वास्तव परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, असे खासदार लंके यांनी सांगितले.

Crop Damage
School Vehicle Violations: शालेय मुलांचा जीवघेणा प्रवास; ना लायसन, ना सुरक्षा

दुष्काळी परिस्थितीचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे, तर पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच शासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news