Road Project: छत्रपती संभाजीनगर महामार्ग वडाळ्यापर्यंत होणार काँक्रिटचा; ४१ किलोमीटरसाठी ५६७ कोटींचा निधी मंजूर

येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
Road Project: छत्रपती संभाजीनगर महामार्ग वडाळ्यापर्यंत होणार काँक्रिटचा; ४१ किलोमीटरसाठी ५६७ कोटींचा निधी मंजूर
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नगर ते वडाळा हा ४१ किलोमीटर रस्ता आता क्राँकीटचा केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ५६७ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी या रस्त्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले. संबंधित रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता झाल्याचे त्यांनी सांगितले.

Road Project: छत्रपती संभाजीनगर महामार्ग वडाळ्यापर्यंत होणार काँक्रिटचा; ४१ किलोमीटरसाठी ५६७ कोटींचा निधी मंजूर
Mula Dam Water Level: संततधारेचा ‘मुळा’ला ३.६ टीएमसीचा बुस्टर

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची लांबी १०४ किलोमीटर आहे. यातील वडाळा ते छत्रपती संभाजीनगर येथपर्यंतचा रस्ता बीओटी तत्त्वावर विकसित केला जात आहे. मात्र, अहिल्यानगर ते वडाळा रस्त्याची आजही दुरवस्था आहे. हा ४१ किलोमीटर रस्ता २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे खराब झाला होता.

पांढरीपूल घाट परिसरात रिफ्लेक्टर, संरक्षक कठडे, रस्त्यांच्या खुणांचा अभाव असल्याचेही दिसले. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी या रस्त्याची पाहणी केली असता, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ रस्ता दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार, श्रीदत्त दिंगबर या एजन्सीने घोडेगावच्या दिशेने डांबराने खड्डे बुजविण्याचे कामही सुरू केले होते. मात्र आखाती युद्धामुळे डांबराचा तुटवडा जाणवल्याने हे काम बंद पडले होते. पुढे, मे महिन्यात काम सुरू झाले, मात्र पाऊस झाल्याने ते आजपर्यंत बंद आहे. परंतु, लवकरच रस्त्याची दैना दूर होणार आहे.

जूनमध्ये मिळाली प्रशासकीय मान्यता

नगर ते वडाळा हा मार्ग सिमेंट क्राँकीटचा केला जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांनी जून २०२६ मध्ये ५६७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. आता तांत्रिक मान्यताही दृष्टिपथात आहे. जुलैमध्येच यासाठी निधी उपलब्ध होऊन, निविदा प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर काम सुरू होईल.

Road Project: छत्रपती संभाजीनगर महामार्ग वडाळ्यापर्यंत होणार काँक्रिटचा; ४१ किलोमीटरसाठी ५६७ कोटींचा निधी मंजूर
Employee Harassment: अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कंपनी कामगाराने संपवल जीवन; तीन आरोपींना अटक

पांढरीपूल घाटातूनही सुरक्षित प्रवास

पांढरीपूल घाट हा अपघातांना निमंत्रण देणारा आहे. मात्र आता या परिसरात आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्यात येणार असून, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी जलनिस्सारण व्यवस्थेचीही सुधारणा केली जाणार आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती, रिफ्लेक्टर, साइड ड्रेनेज आणि इतर पूरक नागरी कामांचाही समावेश प्रकल्पात करण्यात आल्याचे समजते.

असा होणार सिमेंटचा रस्ता

सध्या या मार्गाची रुंदी दोन्ही बाजूंनी ७-७ मीटर असून, आता दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन मीटरने रुंदी वाढविण्यात येणार आहे. विद्यमान रस्त्याचे स्थिरीकरण करून त्यावर लीन काँक्रिटचा बेस लेयर आणि त्यानंतर उच्च दर्जाचे सिमेंट काँक्रीट पेव्हमेंट टाकण्यात येणार आहे.

तसेच दोन्ही बाजूंना नवीन साईडपट्या, मध्यभागी आधुनिक दुभाजक, रस्ता चिन्हे, किलोमीटर दगड, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, पादचारी सुविधा, अन्य अत्याधुनिक रस्ता फर्निचरची कामे होणार आहे.

नगर ते वडाळा हा रस्ता क्राँक्रीटचा केला जाणार आहे. त्यासाठी ५६७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निधी उपलब्ध होऊन निविदा प्रक्रिया होईल. मात्र, तोपर्यंत दुरुस्ती, खड्डे बुजवून हा रस्ता सुस्थितीत कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न असेल.

- विवेक माळुंदे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news