

श्रीरामपूर: श्रीरामपूर व राहुरी तालुक्याच्या म्हणजेच श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील मध्यवर्ती गाव असल्याने बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे अशी मागणी दोन्ही तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांचेकडे केली आहे.
बेलापूर हे श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीकाठाच्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे बाजार समितीचे उपबाजार केंद्रे तसेच जुनी बाजारपेठ असल्याने नदीकाठाच्या गावांचा बेलापूर येथे दैनंदिन संपर्क असतो. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे बेलापूर येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय झाल्यास श्रीरामपूर तालुक्यातील कडीत, मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, नर्सरी, बेलापूर खुर्द, बेलापूर,ऐनतपूर, वळदगाव, उंबरगाव, पढेगाव, कान्हेगाव, लाडगाव, मालुंजे, भेर्डापूर, तर राहुरी तालुक्यातील, केसापूर, आंबी, डवणगाव, चांदेगाव, ब्राम्हणगाव, करजगाव, बोधेगाव, पाथरे आदी गावांसाठी सोयीस्कर होईल. तरी बेलापूर प्राथमिक आरोग्य केन्द्राचे ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित व्हावे अशी मागणी मंत्री विखे पा.यांचेकडे करण्यात आली असून त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.