

पारनेर : तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पाऊस बरसतआहे. चक्क मे महिन्यात पाऊस पडत असल्याने उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव सध्या येत आहे. या पावसामुळे शेतमालाचे व फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दि.24 पर्यंत 10 मंडलांत सरासरी 83.4 टक्के पाऊस झाला असून, तालुक्यात 174.3मिलिमीटर पाऊस पडला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने सर्व दूर हजेरी लावली असताना तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील पारनेर सह टाकळी ढोकेश्वर, निघोज, ढवळपुरी, कान्हूरपठार, भाळवणी, जामगाव, सुपा, वाडेगव्हाण, जवळा, राळेगणसिद्धी आदी परिसरामध्ये सर्वदूर पाऊस पडला आहे. पावसाने भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात नाले, बंधारे भरले असून, नद्या वाहत्या झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षोपासून मे मध्ये कधीही एवढा पाऊस पडला नव्हता. मात्र, यावर्षी पावसाने सर्व सरासरी ओलांडली आहे.
मेच्या मध्यातच अवकाळी पाऊस पडल्याने पेरणीला अवकाश आहे. मात्र, उघडीप झाल्यानंतर शेतकरी पेरणी करतील. त्यामुळे कृषी सेवा केंद्रात बी-बियाण्यासाठी शेतकर्यांनी गर्दी केली असून, मोठ्या प्रमाणात बियाणांची खरेदी करण्यात आली आहे.
रविवारी तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. 30 मिलिमीटर होऊन अधिक पाऊस रविवारी पडला असल्याने सर्व दूर तालुक्यात पाणीच पाणी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पारनेर 196.3, भाळवणी 314.4, सुपा 222.5, वाडेगव्हाण 171.3, वडझिरे 112, निघोज 207.7, टाकळी ढोकेश्वर 159.1, पळशी 115.9, कान्हूर पठार 64.3, पळवे खुर्द 182.4. तालुक्यात एकूण 174.3 मिलिमीटर पाऊस झालो.