पंचवटी : म्हसरूळ पोलिसांची कामगिरी! १६ लाखांच्या रोकड लुटीतील संशयित ताब्यात; ४८ तासात तपास | पुढारी

पंचवटी : म्हसरूळ पोलिसांची कामगिरी! १६ लाखांच्या रोकड लुटीतील संशयित ताब्यात; ४८ तासात तपास

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ एका दुकानातील कर्मचाऱ्याची दुचाकीने घरी जात असताना लुटमार केल्याची घटना समोर आली आहे. गाडी अडवून सोळा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घडली होती. त्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ४८ तासात यातील संशयितांना पकडुन १४ लाख ३२ हजार १३० रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार केले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शनी मंदिर, पेठ रोड येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार विलास चारोस्कर, राजेश राठोड यांना मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावून संशयित संदेश सुधाकर पगारे उर्फ काळ्या याला त्याच्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम.एच.१५ एफ.जी. २५१२ सह ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार सागर सुधाकर पगारे, माउ उर्फ वैभव गांगुर्डे, अतुल सैयद, असलम सैयद, अशांनी मिळून केला असल्याची कबुली दिली व त्यांचे वाटयाला आलेली रोख रक्कम ९ लाख ४९ हजार ८३० रोख रूपये, व्हिजीटिंग कार्ड, पाकीटे, एच डी एफ सी बँकेचे चेक बुक असे ताब्यात घेण्यात आल्या.

याच दरम्यान पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी फुलेनगर जवळील पाटाजवळ येणार असल्याची खबर मिळाल्याने तेथे सापळा लावुन संशयित अतुल सुरज सैयद व असलम गफुर सैय्यद यांना एम एच १५ बी सी ४२७७ या दुचाकीसह मोबाईल फोन, पाकीट, रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपींकडुन १३ लाख ९४ हजार ८३० रूपये रोख ३४ हजार रूपये किंमतीचे दोन मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १४ लाख ३२ हजार १३० रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर संशयितांना पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Back to top button