ITBP Selection : अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली सैन्य दलात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस | पुढारी

ITBP Selection : अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली सैन्य दलात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : एस.एस.सी.मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) सैन्यदलामध्ये निजामपूर जैताणे येथील फाल्गुनी योगेश्वर भामरे निवड झाली आहे.निजामपूर जैताणे गावातील प्रथमच हया कन्याची सैन्यदलात निवड झाली.आदर्श विद्या मंदिर येथे दहावीचे शिक्षण पूर्ण करून राहुरी फॅक्टरी येथील कर्मवीर अकॅडमी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, संभाजीनगर येथुन प्रशिक्षण घेतले होते.

फाल्गुनी भामरे ही निजामपूर जैताणे येथील संदेश टेलर योगेश्वर भामरे,व अंगणवाडी सेविका शारदा भामरे यांची जेष्ठ कन्या आहे. तिला प्रमुख मार्गदर्शन मेजर राजेंद्र पाटील, पो. कॉ. योगीता बाचकर, डि. टी. ठाकरे, डि. एम. जाधव, सचिन बारे, पुणे येथील सपोनी मुरलीधर कनखरे, भैय्या भामरे, संजय भामरे आदि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

सैन्य दलात भरती झाल्याबद्दल फाल्गुनीचे गणपती मंदिर, व्यापारी असोसिएशन व पंचायत समीती सदस्य सोनाली पगारे, उपसरपंच बाजीराव पगारे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button