एसटी दगडफेक : धुळ्यात एसटी आंदोलनाला हिंसक वळण; चालक जखमी - पुढारी

एसटी दगडफेक : धुळ्यात एसटी आंदोलनाला हिंसक वळण; चालक जखमी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा

धुळे आगारातून आज पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांनी बस सेवा सुरू करण्यास विरोध केला. तर संपकरी कर्मचाऱ्यांनी देखील गांधीगिरी करत आंदोलन केले .मात्र पोलिस बंदोबस्तात या बस शिंदखेडा तालुक्यातील गावांना रवाना करण्यात आल्या. (एसटी दगडफेक)

दरम्यान नरडाणा येथुन परत येत असताना धुळे शहरालगत असलेल्या नगावबारी नजीक अज्ञात व्यक्तींनी या बसवर दगडफेक केली. यात बसची काच फुटून चालक विजय भामरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

याबाबत चालक भामरे यांनी सांगितले की, ते 2019 च्या सरळसेवेने भरती मध्ये पात्र झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना सेवेत रुजू करण्यात आले. नंतर आज विभाग नियंत्रक यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात बस रवाना झाली. पण नरडाणा येथून परत येत असताना, अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याने बसचे नुकसान झाले. (एसटी दगडफेक)

त्यामुळे बस सेवा सुरू करण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी त्यांनी केली आहे .दरम्यान या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button