जळगाव : डंपरची दुचाकीला धडक; एक ठार, २ जण जखमी | पुढारी

जळगाव : डंपरची दुचाकीला धडक; एक ठार, २ जण जखमी

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

तालुक्यातील नशिराबाद येथे रात्री (गुरूवार) डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, नशिराबादच्या सिद्धार्थनगरात राहणारे विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय २५), रोहित दगडू इंगळे (वय २५), उदय भगवान बोदडे (वय २३) असे तिघे एमएच-१९, डीएस-८६९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी येत होते. दरम्यान, महामार्गावरील उड्डाण पुलाखालून सुनसगावकडे जाणार्‍या एमएच-१९ झेड, ४७४८ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात विशाल उर्फ विकी रमेश रंधे याचा जागीच मृत्यू झाला. तर रोहित इंगळे आणि उदय बोदडे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील रोहित इंगळे याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Back to top button