नाशिक : दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक बेपत्ता | पुढारी

नाशिक : दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक बेपत्ता

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक रविवारी (दि.16) सायंकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शर्मा असे या युवकाचे नाव आहे. धबधबा परिसरात अंधार असल्याने प्रशासनाला युवकाचा शोध घेणे शक्य झाले नाही. सोमवारी (दि.17) त्याचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आपती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

जिल्हा आपती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दुगारवाडी धबधबा येथे चार युवक फिरायला गेले होते. त्यापैकी अमित हा पाण्यात बुडाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमित सोबत त्याचा भाऊ मनीष हा देखील होता. पण सायंकाळनंतर अंधार झाल्याने यंत्रणांना अमितचा शोध घेणे शक्य झाले नाही. उद्या (दि.17) सकाळी भोसलाची टीम आणि आपदा मित्र यांच्या साहाय्याने अमितचा शोध घेतला जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात पावसाळी सहलीसाठी दुगारवाडी धबधब्याला पर्यटकांची पहिली पसंती मिळते आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्हासह मुंबई-पुण्याचे हजारो पर्यटक येथे वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी दाखल होतात. मात्र, तेथील पाण्याच्या खोलीचा व वेगाचा अंदाज येत नसल्याने यापूर्वी बरच्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Back to top button