उत्तर प्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार | पुढारी

उत्तर प्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार

सिडको, पुढारी वृत्तसेवा : सिडको सिंहस्थनगर येथून नेपाळकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल बसला उत्तर प्रदेशात लखनऊ जवळ अपघात झाला. या  अपघातात सिडकोतील सिंहस्थनगर येथील महिला ठार झाली असून दोन जण जखमी झाले आहेत . या घटनेने सिंहस्थनगर परिसरावर शोककळा पसरली आहे . सुनिता अर्जुन अवारे ( वय ५५ ) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सिडकोतील सिंहस्थनगर येथील ३९ लोक दोन टेम्पो ट्रॅव्हल बस ने १ जून रोजी नेपाळ काठमांडु कडे निघाले होते. या वेळी विविध शहरांना भेटी देत नेपाळकडे जात होते.

नेपाळ काठमांडू येथे दिनांक १० जुन रोजी पोहोचणार होते. नेपाळकडे जात असताना या वेळी लखनऊ जवळ चंदा गावाजवळ एशिपुर गावा जवळ बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान टेम्पो ट्रॅव्हल बस ने रस्त्यालगत उभी असलेल्या ट्रक ला मागुन ठोस दिली. या अपघातात बस च्या डाव्या बाजूच्या सिट वर बसलेल्या सुनिता अर्जुन अवारे अवारे ( वय ५५ ) यांना गंभीर मार लागल्याने ठार झाले. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत त्यांना लौखनो येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत तीस जणांना रेल्वेचे बुकीग करून दिले आहे ते बुधवारी दुपारी रेल्वेने नाशिक कडे रवाना झाले आहेत . अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे यांनी दिली. तर इतर आठ जण दुसऱ्या टेम्पो ट्रॅव्हल बस ने नाशिक कडे रवाना झाले आहेत तर मयत सुनिता आवारे यांच्यावर आज गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . मयत सुनिता यांच्या पश्यात पती ,मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button