नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात | पुढारी

नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. खरे यांच्यासह एक वकीलास देखील ताब्यात घेतले आहे.

सतिश भाऊराव खरे (५७, रा. आई हाईट्स, कॉलेज रोड) असे सहकारी संस्थेतील जिल्हा उपनिबंधकाचे नाव आहे. तर , शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड) असे पकडलेल्या वकीलाचे नाव आहे.

नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकित तक्रारदार संचालक पदी निवडून आले आहेत. मात्र या निकालाविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल आहे. या प्रकरणावरवर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्याच्या मोबदल्यात खरे व ऍड. सभद्रा यांनी तक्रारदराकडे सोमवारी 30 लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदराने खरे विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करीत सापला रचला. खरे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यासाठी कॉलेज रोडवरील निवासस्थानी बोलवले. त्यानुसार विभागाने सापळा रचला. लाच घेताना सतीश खरे यांना रंगेहाथ पकडले. खरे यांच्यासोबत ऍड. सभद्रा यास ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. विभागाचे एक पथक खरे यांच्या मालमत्तेसह घरझडती घेत होते.

Back to top button