जळगाव: यावल येथे केळी बागेची नासधूस; २५ लाखांचे नुकसान | पुढारी

जळगाव: यावल येथे केळी बागेची नासधूस; २५ लाखांचे नुकसान

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या शेत शिवारामधील ९ हजार केळीच्या रोपांपैकी ७ हजार केळीचे खोड अज्ञातांने कापून टाकले. त्यामुळे एकूण २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात इसमांविरूध्द यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या यावल शिवारातील शेतामध्ये केळीचे ९ हजार रोप लागवड करण्यात आली होती. फिर्यादीचा मुलगा भूषण चौधरी हा आज (दि. ५) सकाळी शेतामध्ये गेला. यावेळी शेतामधील 7 हजार केळीच्या खोडांची व घडांची कापून नुकसान केलेले दिसले. ही घटना त्यांने वडिलांना भ्रमणध्वनीवरून कळवली त्यानंतर परिसरातील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

हेही वाचा

Back to top button