नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघात; तीन ठार तर एक जखमी | पुढारी

नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघात; तीन ठार तर एक जखमी

वणी; पुढारी वृत्तसेवा : वणी-सापुतारा महामार्गावर, चौसाळे फाट्यानजीक चारचाकी रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात झाला. या अपघातात दोन युवतींसह एक युवकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे.

याबाबत वणी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, मंगळवार (दि.२८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वणी-सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्यानजीक भरधाव वेगातील चारचाकी चालकाचा ताबा सुटल्याने वाहने रस्ता सोडून खाली गेल्याने हा अपघात झाला. या अपघातात अंजली राकेश सिंग (वय २३ वर्षे रा. सातपुर, नाशिक), नोमान चौधरी (वय २१ वर्षे रा. सातपुर अंबड लिंक रोड नाशिक) व सृष्टी नरेश भगत (वय २२ वर्षे रा. रामबाज स्क्वेअर, नागपुर) हे तीघे मयत झाले आहे. तर अजय गौतम (वय २० वर्षे रा. सातपुर लिंक रोड नाशिक) हा जखमी झालेला आहे.

जखमींना पुढील उपचाराकरिता नाशिक जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वणी पोलिसात सुरू होते. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस तपास करीत आहे.

Back to top button