नाशिक : देवळा पोलिसांच्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका | पुढारी

नाशिक : देवळा पोलिसांच्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उमराणे येथे आज (दि 16) रोजी कत्तलीलासाठी जाणाऱ्या 20 गोवंशाची देवळा पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे सुटका झाली आहे .

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,अग्निवीरचे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एका सहा चाकी (क्र. एम एच 12, जी टी 7000) वाहनातून २० गोवंशाची चांदवड मार्गाने उमराणे, सौंदाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी बेकायदेशिर वाहतुक होत असल्याच्या आधारे अग्नीवीर हिंदू संघटना, गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, वाल्मिक सैंदाणे, संतोष केंदाळे, चिराग जोशी, गौरव मते यांना राहुड घाटाच्या पायथ्याशी रात्री 02:30 वाजताच्या सुमारास ही गाडी आढळून आली.  हे वाहन मालेगावच्या दिशेने नेले.

मच्छिंद्र शिर्के यांनी ११२ क्रमांकावर माहिती देऊन देवळा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वाहन चालकाला कोणतरी पाठलाग करत असल् वाहन उमराणे गावाच्या उड्डाणपुलाखालून मनमाडकडे वळवण्याचा प्रयत्न केला असता टर्न न बसल्याने वाहन चालकाने सदर वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनास्थळ देवळा पोलीस हजर झाले. वाहनाच्या पाठीमागे बघितले असता त्यात 16 गाई व 4 लहान वासरे असे एकूण 20 गोवंश दोरीने तोंड पाय घट्ट बांधून, दाबून कोंबून, निर्दयतेने, जखमी अवस्थेत पोलिसांना व गोरक्षकांना मिळून आले .

मच्छिंद्र शिर्के (मालेगाव) यांच्या फिर्यादी नुसार देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात देवळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुमारे रू.३,१८,०००/- किमतीची गोवंश जनावरे व रु.5,00,000/- किमतीचे सहा चाकी ट्रक वाहन असा रू.८,१८,०००/- किमतीचा मुद्देमाल देवळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुभाष चव्हाण करीत आहेत. दरम्यान मालेगाव शहरात कत्तलीसाठी गोवंश आणणाऱ्या शेख मुश्रीफ शेख अक्रम, जव्वा सरवार पहिलवान आणि आसिफ वायरमन यांच्यावर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी शिर्के यांनी केली आहे .

Back to top button