17व्या विद्रोही सहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वानखडे यांची निवड

चंद्रकांत वानखडे
चंद्रकांत वानखडे

नाशिक : ज्येष्ठ लेखक, पत्रकार, संपादक चंद्रकांत वानखडे यांची 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 4 व 5 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमने-सामने आयोजित करण्यात आले आहे.

चंद्रकांत वानखडे हे समकालीन मराठीतील जीवन व लेखन यात द्वैत न मानणारे महत्त्वपूर्ण लेखक आहेत. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील त्यांचे लेखन 1986 च्या साहेबराव करपेंच्या पहिल्या आत्महत्येपासून महाराष्ट्राने पाहिले आहे. 'असे छळले राज बंद्याना', 'एक साध्या सत्यासाठी' या आपल्या पुस्तकांपासून ते अलीकडील 'पुर्नविचार' तसेच 'गांधी का मरत नाही?' या सुप्रसिद्ध वैचारिक पुस्तकापर्यंत त्यांनी स्पष्टपणे फॅसिझमविरोधी, जीवनवादी, समतामूलक, धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी भूमिका सातत्याने मांडली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news