नशिराबाद येथे गोळीबारासह चॉपरने हल्ला; एक ठार, एक गंभीर - पुढारी

नशिराबाद येथे गोळीबारासह चॉपरने हल्ला; एक ठार, एक गंभीर

जळगाव, पुढारी ऑनलाईन : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्‍याने आज नशिराबाद जवळ गोळीबार आणि चॉपर हल्ला केल्याने एकाची हत्या झाली असून एक जखमी झाला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आज जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी भुसावळ येथे जात असताना नशिराबादजवळ त्यांच्यावर गोळीबारा सह चॉपरने हल्ला करण्यात आला.

यातील एक जण हा जागीच ठार झालेला असून दुसरा गंभीर जखमी झालेला आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Back to top button