जळगाव : दीड हजाराची लाच भोवली; कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

जळगाव : दीड हजाराची लाच भोवली; कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या पाचोरा येथील कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पावर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मंजूर झाला होता.

मशीन खरेदी केली असता सदर योजनेअंतर्गत मिळणारी ८५ हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्यात येते. दरम्यान या मोबदल्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरेयाने दीड रुपयाची मागणी केली होती.


याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि. २४) लाच लुचपत विभागाने सापळा रचून दीड हजार रुपयाची लाच स्विकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.

या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. यांनी केली कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

Back to top button