खासदार जलिल यांच्यावर कारवाईसाठी आंदोलन | पुढारी

खासदार जलिल यांच्यावर कारवाईसाठी आंदोलन

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद शहरात उभारण्यात येणार्‍या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास विरोध करणार्‍या ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलिल यांच्या छायाचित्राला जोडे मारत अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाच्या मालेगाव शाखेने निषेध नोंदविला. अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. त्यास स्थानिक खासदार इम्तियाज जलिल यांनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठी घेतलेली भूमिका ही दोन समाजांत तेढ निर्माण करणारी असून, त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्रांती दलाने केली. अपर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जलिल यांच्या छायाचित्राला जोडे मारण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. विविध संघटनांतर्फे खासदार जलिल यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार, भाऊसाहेब पाटील, पोपटराव पोटे, भाजपचे लकी गील, विवेक वारुळे, नितिन पोफळे, कमलेश निकम, प्रदीप देवरे, रुमेश पवार, कैलास शर्मा, शरद अहिरे, जिभाऊ कोर, दीपक सावंत, महेश देवरे, जगदीश काकाणी, समाधान साळुंके, महेंद्र चव्हाण, भावसिंग पवार, रवींद्र कदम आदी उपस्थित होते.

हे ही वाचा :

Back to top button