नाशिक : निफाडचा गोदाकाठ बिबट्याच्या दहशतीखाली | पुढारी

नाशिक : निफाडचा गोदाकाठ बिबट्याच्या दहशतीखाली

उगांव ; पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या शिंगवे सायखेडा करंजगांव भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. कधी शेतात बिबट्याच्या पावलाचे ठसे तर कधी बिबट्याचे दर्शन यामुळे शेतकरी शेतमजुर हवालदिल झाले आहेत. त्‍यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

दरम्यान, शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना (गुरुवार) मध्यरात्री बिबट्याने जोरदार डरकाळी फोडत दर्शन दिले. त्याचे चित्रिकरणही मोबाईल मध्ये केले आहे.

गोदाकाठच्या शिंगवे सायखेडा भागात नेहमी बिबट्या दिसतो आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास धजावत नाहीत. बिबट्याचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी करंजगाव, शिंगवे, सायखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button