

मुंबई : कार्ड क्लोन करुन खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार सांताक्रूझ परिसरात घडला. सांताक्रूझ पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या दिपांकर रमेश मंडल हे मूळचे कोलकाताचे रहिवाशी असून ते मरोळ परिसरात राहतात. जुहू-तारा रोडवरील एका बँकेत ते मॅनेजर म्हणून काम करतात. 11 ऑक्टोबरला त्यांच्या लोअर परेल येथील मुख्य कार्यालयातून त्यांना मेल आला. त्यांच्या एटीएम सेंटरमधून कार्ड क्लोन करुन विविध खातेदारांच्या बँक खात्यातून सुमारे दीड लाख रुपये काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.