मुंबई : डोंगरीतील दर्ग्यात आतंकवादी शिरल्याचा खोटा कॉल

मुंबई : डोंगरीतील दर्ग्यात आतंकवादी शिरल्याचा खोटा कॉल

मुंबई : डोंगरीमधील दर्ग्यात आतंकवादी घुसले असून त्यांच्या हातामध्ये रायफल आहेत. पोलीस मदत हवी आहे, असा धमकीचा कॉल बुधवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश साबणे (55) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकरा ते अडीचच्या दरम्यान एका व्यक्तीने पीसीओ बुथवरून कॉल केला. त्याने काही पुरुष आणि महिला आतंकवादी दर्ग्यामध्ये घुसले असून त्यांच्या हातामध्ये रायफल आहे. पोलीस मदत हवी आहे, असे सांगून कॉल कट केला. मुख्य नियंत्रण कक्षाने तत्काळ डोंगरी पोलिसांना कळवले. डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news