प्रताप सरनाईक पुन्हा ईडीच्या रडारवर

प्रताप सरनाईक पुन्हा ईडीच्या रडारवर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ होणार आहे. ईडीने सरनाईक यांची11 कोटींची संपत्ती तात्पुरती कारवाई करत जप्त केली होती. ही कारवाई योग्य असल्याचा निर्णय अर्ध न्यायिक संस्थेने दिला आहे. त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडवरील एका फ्लॅटसह 11 कोटींची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.

प्रताप सरनाईकांची संपत्ती जप्त करण्यासाठी आता ईडीने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. ईडीमार्फत केलेली जप्तीची कारवाई योग्य असल्याचे अर्ध न्यायिक संस्थेने सांगितल्यामुळे आता प्रताप सरनाईक यांची तब्बल 11.4 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालय ताब्यात घेणार आहे. दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकतात.

प्रताप सरनाईक यांचा एनएसईएल घोटाळा प्रकरण हे 2013 मध्ये चर्चेत आले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली होती.याप्रकरणात ईडीने संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू केली होती. या घोटाळ्यातील आरोपींनी गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतर कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली आहे. आता यामधील सरनाईक यांची प्रॉपर्टी ईडीने जप्त करत त्यांना मोठा धक्का दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

एनएसईएल मनी लाँडरिंग प्रकरणात आमदार सरनाईक, मुलगा विहंग व पूर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांची नावे आहेत. 2016 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (एनएसईएल) सदस्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे इतर कामांसाठी वळवले, असे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी वापरले जात होते, असा आरोप सरनाईकांवर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news