अंधेरीत फक्त 31.74 टक्के मतदान

अंधेरीत फक्त 31.74 टक्के मतदान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी फक्त 31.74 टक्के मतदान झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह
अन्य सात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून निकाल 6 नोव्हेंबरला घोषित होईल.

सर्व 256 मतदान केंद्रांवर सकाळी11 पर्यंत 9.72 टक्के मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत हे प्रमाण16.89 टक्क्यांवर पोहचले. दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. एकूण सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत
पाटील यांनी दिली.

या मतदारसंघात मराठी 1 लाखावर तर गुजराती मते 50 हजारांच्या आसपास आहेत. उमेदवार मागे घेतला असला तरी भाजप नोटाचा प्रचार करत असल्याची तक्रार उद्धव ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यामुळे 6 तारखेला,
किती नोटा मते पडतात याबद्दल उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news