

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
बुलडाणा आणि छत्रपती संभाजीनगर येथील विविध पक्षांतील शेकडो पदाधिकार्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्याप्रसंगी पवार यांनी निवडणुकांबाबत शक्यता व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीमधील घटकपक्षांना यश मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी पदाधिकार्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, सर्व समाजघटकांतील विद्यार्थी, युवक, युवतींना दर्जेदार शिक्षण देण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे. आपण विकासाला प्राधान्य दिले आहे. मात्र, विरोधकांकडे कसलाच मुद्दा नसल्याने त्यांनी मराठीचा मुद्दा काढला, अशी टीकाही त्यांनी केली.