वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; जुहूतील बार सील

जुहूच्या व्हाईस ग्लोबल तपस बार सील
Vice Global Tapas Bar Seal in Juhu
वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्कने मोठी कारवाई करत जुहूतील बार सील केला. Pudhari Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरळी हिट अँड रन प्रकरणी संशयित फरार आरोपी मिहिर शहाला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागानेही मोठी कारवाई केली आहे. जुहूच्या व्हाईस ग्लोबल तपस बारला सील ठोकले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार सील करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वरळी दुर्घटनेतील पहिला आरोपी मिहीर शहा याने त्याच्या चार मित्रांसोबत जुहू येथील व्हाईस ग्लोबल तपस बारमध्ये पार्टी केली होती.

Vice Global Tapas Bar Seal in Juhu
वरळी हिट अँड रन : ७२ तासांनंतर फरार मिहिर शहाला अटक

उत्पादन शुल्क विभागाकडून या बारची दोन दिवस चौकशी

रविवारी झालेल्या अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून या बारची चौकशी सुरु केली होती. बारमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पोलिसांनी जप्त केला होता. चौकशीत नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा बार सील करण्यात आला आहे. मिहिर शहा शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ४ मित्रांसह अलिशान कारमधून बारमध्ये आले होते. त्यांच्यासोबत मुलगी नव्हती. सर्वांनी एक बिअर घेतली. त्यावेळी चौघेही नॉर्मल होते. बिल देऊन ते सर्वजण रात्री दीडच्या सुमारास बारमधून निघून गेले, असे बारचे मालक करण शहा यांनी पोलिसांना सांगितले.

Vice Global Tapas Bar Seal in Juhu
Worli hit and run case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शहा यांना जामीन मंजूर

मिहिर शहाला ७२ तासांनंतर अटक

वरळी हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी मिहिर शहाला ७२ तासांनंतर अटक करण्यात आली आहे. मिहिरने आपल्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला रविवारी धडक दिली होती. यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून तो फरार झाला होता. तर या प्रकरणात त्याच्या वडिलांना जामीन मिळाला आहे. मिहिर देश सोडून जाऊ नये, म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news