

राजेश सावंत
मुंबई : मुंबईत पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यासाठी किमान 8 दिवस मुक्काम करावा लागतो. मुंबई भेटीवर आल्यानंतर बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला (नॅशनल पार्क) भेट देणे आवश्यक आहे. हे जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान असून जे आंतरराष्ट्रीय शहरातच आहे. 103 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हे उद्यान पसरले असून, येथे 40 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या 254, फुलपाखरांच्या 150 प्रजाती आणि सरपटणारे प्राणी आहेत. जंगल सफारीसाठी बसचीही व्यवस्था आहे. तर मिनी ट्रेनमधून जंगलचा फेरफटकाही मारू शकता. त्याशिवाय येथे नौका विहारही करू शकता.
येथे कसे यायचे
बोरिवली रेल्वे स्टेशनवर पूर्वेकडून चालत 15 ते 20 मिनिटात नॅशनल पार्कच्या मुख्य गेटपर्यंत येऊ शकता. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत येते तुम्ही भटकंती करू शकता.
ग्लोबल विपश्यना पॅगोडा
म्यानमारमधील विपश्यना शिक्षक सयाजी यू बा खिन यांना श्रद्धांजली म्हणून बांधलेला पॅगोडा एक ध्यान घुमट आहे. गोराई बेटाच्या हिरव्यागार व शांत वातावरणात वसलेले, ग्लोबल विपश्यना ध्यान पॅगोडा हे मुंबईतील पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
येथे कसे याल : बोरिवली पश्चिमेला बस अथवा ऑटो रिक्षाने गोराईपर्यंत येऊ शकता. पुढे बोटीने खाडी क्रॉस करून पॅगोडापर्यंत पोहचू शकता.