'स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे...,' देवेंद्र फडणवीस यांची लेकीसाठी पोस्ट

Devendra Fadnavis | कन्यादिनानिमित्त फडणवीसांनी दिल्या लेकीला शुभेच्छा
Devendra Fadnavis message to daughter
'स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे...,' देवेंद्र फडणवीस यांची लेकीसाठी पोस्ट file photo
Published on
Updated on

मुंबई : २२ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक कन्यादिन (World Daughters Day 2024) साजरा झाला. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या लेकीला शुभेच्छा देत दोघांचेही छान असे छायाचित्र एक्स या समाज माध्यमावर शेअर केले आहे. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी एक संदेश आपल्या मुलीच्या नावाने लिहिला आहे.

त्यात ते म्हणतात, 'या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मुलींना शुभेच्छा देवूया आणि हा दिवसा साजरा करूयात. त्यांना नेहमीच नवीन उंची गाठण्यासाठी सक्षम करूया. माझ्या प्रिय दिविजाला कन्यादिनाच्या शुभेच्छा. माझा अभिमान, आनंद आणि शक्ती ! स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे. भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे.. आंतरराष्ट्रीय कन्यादिनाच्या शुभेच्छा.' दरम्यान फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोबतच राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या मुलीसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news