

Nagar Parishad Election 2025:
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच, निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित याचिका दाखल असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीला तीन नगरपालिका / परिषदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या मात्र आता ही संख्या ११ वर गेल्याचं कळतंय.
नवीन मतदान वेळापत्रक
फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेसाठी आता अनुक्रमे २० आणि २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.
बारामती नगरपरिषदेसाठी देखील २ डिसेंबर रोजी होणारे मतदान आता २० डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलण्यामागे प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
न्यायालयीन हस्तक्षेप:
उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींवर काही जणांनी आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाचे निर्देश:
न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे. तसेच, न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते.
नगराध्यक्ष पदाचा वाद:
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरील आरोपांबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने कोणताही वाद टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोगानं एक परीपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी काही नगरपालिका निवडणुका का पुढे ढकलण्यात येत आहेत. आणि त्याचा सुधारित तारखा काय आहेत याबाबतची माहिती दिली.
बारामती नगर परिषदेची उमेदवार अर्ज दाखल करण्याची मुदत ही दुपारी ३ वाजेपर्यंत होती. मात्र ही प्रक्रिया वेळेआधीच म्हणजे पावणेतीनलाच बंद करण्यात आली. तसंच अर्ज भरताना प्रक्रियेत काही त्रुटी देखील राहिल्या होत्या. यानंतर काही जणांनी यावर आक्षेप घेतला.
न्यायालयानं भाजपच्या दोन उमेदवारांना तारीख संपल्यानंतरही अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला होता. याचबरोबर काही ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवरील आरोपाबाबतही प्रकरण न्यायलात गेलं अन् निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यामुळं निडवणूक आयोगानं वाद टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
बारामतीप्रमाणे महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिकेच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसंच यव यवतमाळमधील दिग्रस पांढरकवडा आणि वनी येथील काही प्रभागांची ही निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.