

ठाणे/मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या 'चल हल्ला बोल' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात आला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांना तसेच पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत, कोण नामदेव ढसाळ ? अशी विचारणा सेन्सॉर बोडनि केल्याने साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचा एक मानबिंदू ठरलेल्या पँथरचाच हा अपमान असल्याने सेन्सॉरच्या या आगाऊपणावर आंबेडकरी चळवळही खवळून उठली आहे.
ढसाळ कोण, असे विचारणाऱ्यांची त्या पदावर बसायची लायकी आहे का, असा सवाल ढसाळ यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका मल्लिका अमरशेख यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना केला आहे. ढसाळ यांच्या कवितांचे स्वामित्व हक्क माझ्याकडे आहेत, परंतु त्यांच्यावर चित्रपट करणाऱ्यांनी चित्रपटात कविता घेताना माझी परवानगी घेतलेली नाही, आता हे प्रकरण दलित पँथर पाहून घेईल, असा इशाराही मल्लिका यांनी दिला.
"लोकांचा सिनेमा चळवळ (पीपल्स मुखी) सुरु केली आहे. या चळवळीच्या वतीने लोकसहभागातून दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या 'चल हल्ला बोल' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडीत होत नाही.... स्वातंत्र्य कुठल्या गाढ़वीचे नाव आहे.... कधी इथ नांदत नाही... पुरोगाम्याचे कुरखे कधीच फाटलेत, अशा काही कविता या चित्रपटात घेण्यात आल्या आहेत. या कवितांना आणि चित्रपटातील काही रश्यांवरही आक्षेप घेत सेन्सॉर बोडनि चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी नोटीस बजावली.
बनसोडे म्हणाले, या सिनेमाची कथा दलित पँथर, युवा क्रांती दल चळवळीवर आधारित असल्याने सिनेमात महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता घेतली. सेन्सॉर बोडाने आता ही कविताच काढायला सांगितली आहे. कवितेत शिव्या आहेत, अश्लीलता आहे असे सेन्सॉर बोडांचे म्हणणे आहे. आम्ही सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ यांची माहिती दिली तेव्हा 'कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही... असे बोर्डाच्या सदस्यांनी आम्हांला ऐकवले.
खरे तर १जुलै २४ रोजी सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला होता. त्यानंतर हा सिनेमा पुर्नलोकन समितीकडे पाठविण्यात आला. त्याची रीतसर फी आम्ही भरली. ६ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट आम्हांला प्रदर्शित करावयाचा होता. परंतु सेन्सॉर बोर्ड कसलाच प्रतिसाद देत नाहीत. आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले, प्रत्यक्षात ऑफिसला भेटी दिल्या परंतु 'चल हल्ला बोल' साठी कोणताही अधिकारी वेळ देत नाही, अशी खंत बनसोडे यांनी बोलून दाखवली. मल्लिका अमरशेख यांनी कवितांच्या स्वामित्व हकाबाइल उपस्थितीत केलेला प्रत्र बनसोडे यांना विचारला असता, मी त्यांच्याशी बोलेन, चित्रपटाची कथा आणि चित्रपट पाहिल्यावर त्याही तयार होतील, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.