Mumbai Slum Demolition : गरीबनगरमध्ये तोडक कारवाई 100 टक्के पूर्ण

आजपासून कंपाऊंड घालण्याचे काम
Mumbai Slum Demolition
मुंबई : गरीबनगर झोपडपट्टीमधील अनधिकृत घरे जमिनदोस्त करण्याचे काम शुक्रवारीही सुरू होते. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीबनगर झोपडपट्टीमधील अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारीही हातोडा मारला असून 100 टक्के तोडक कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. तसेच येथील अधिकृत 100 घरांच्या तळघरावरचे अनधिकृत मजले मशीनचा वापर न करता हाताने पाडले जात आहेत. त्याची ही 50 टक्के कारवाई पूर्ण झाली आहे.

शनिवार संध्याकाळपासून येथे मोकळ्या झालेल्या जागेची स्वच्छता करून कंपाऊंड घालण्याचे काम रेल्वेकडून हाती घेतले जाणार आहे. 19 मे पासून गरीब नगरमधील 500 अनधिकृत झोपडपट्टीधारकांवर रेल्वे प्रशासन, पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त तोडक कारवाई सुरू आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात घरांसाठी वापरलेल्या लाकडी फळ्या व लोखंडी पत्रे यांचे अस्ताव्यस्त ढीग जमा झाले आहेत.

Mumbai Slum Demolition
Mumbai Slum Demolition : गरीबनगरात दगडफेक; लाठीचार्ज!

सध्या सिमेंट आणि विटांचे डेब्रिज हलविण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारपर्यंत हे डेब्रिज पूर्णपणे हलवले जाणार असून संध्याकाळी मोकळ्या झालेल्या जागेला संरक्षण कंपाउंड उभारले जाणार आहे. तसेच येथे राहत असलेल्या निष्कासित झोपडपट्टीधारकांकडून पुन्हा येथे घरे बांधली जाऊ नयेत यासाठी विशेष काळजी रेल्वे प्रशासन घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी येथील कारवाईत तोडलेल्या धार्मिक स्थळावर अल्पसंख्यांक बांधवांकडून सामूहिक नमाज पठण केले जाणार असल्याची अफवा या परिसरात होती. त्यामुळे रेल्वेने जास्तीचा पोलीस फौजफाटा येथे तैनात केला होता. मात्र येथील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

Mumbai Slum Demolition
Pimpri Crime: पिंपरीत गांजा जप्त; बावधनमध्ये कामगारांना लाकडी बांबूने बेदम मारहाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news