सावधान! राज्यात झिका वाढतोय; मुंबईत एन्ट्री

Zika virus | आतापर्यंत १३० रुग्ण आढळले; सतर्कतेचा इशारा
Zika virus
राज्यात आजपर्यंत झिका व्हायरसचे १३० रुग्ण आढळले आहेत. file photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आजपर्यंत १३० झिका रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण पुण्याच्या मनपा क्षेत्रात असून आता दादरमध्ये एक रूग्ण आढळल्याने मुंबई महापालिका आरोग्य विभागा अलर्ट मोडवर आला आहे. दरम्यान झिकाचा धोका गर्भवती महिलांना होण्याच्या शक्यतेने गर्भवती महिलांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दादरमध्ये ८६ वर्षीय पुरूषाला गेल्या आठवडय़ात झिकाची लागण झाली असून हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्ण वयोवृध्द असलेल्या इतरही आजर असल्याचे सांगण्यात आले. पण आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे मनपा विभागात १००, पिंपरी चिंचवड ०६, अहमदनगर (संगमनेर) ११, पुणे ग्रामीण ९, कोल्हापूर १, सांगली (मिरज) १, कोल्हापूर १, सोलापूर १ एकूण १३० रुग्णांची नोंद झाली आहे. झिका रूग्ण सापडल्यानंतर अशा ठिकाणी त्वरीत ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग कामाची सुरुवात करण्यात येते.

दादरमध्ये ५ ,४०,७१२ लोकांची तपासणी करण्यात आली असून ९४,,८४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २७४६ घरांमध्ये डासांची उत्पतीस्थळे सापडली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news