Markandeshwar Temple: वरळीतील पुरातन मार्कंडेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार, ‘टाटा’सोबतच्या बैठकीत निर्णय

मंदिर लवकरच नव्या स्वरूपात उभे राहणार
Markandeshwar  Temple
वरळीतील पुरातन मार्कंडेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार होणार
Published on
Updated on

मुंबई : तेलगू पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेश्वर महामुनी यांचे बीडीडी चाळ परिसरातील श्री मार्कंडेश्वर देवस्थानम मंदिर लवकरच नव्या आणि भव्य स्वरूपात उभे राहणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी म्हाडा, टाटा कन्स्ट्रक्शन व मंदिर विश्वस्त समितीसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

वरळी बिडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू असल्यामुळे या विकासादरम्यान महर्षी मार्कंडेश्वर महामुनी यांचे पुरातन मंदिर पाडण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीत हे मंदिर नव्याने उभारण्याचे ठरवण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सुनील शिंदे, श्री. मार्कंडेश्वर देवस्थानम ट्रस्टचे चेअरमन रमेश मंथेना, सचिव कैलास एकलदेवी, विश्वस्त मधू भोजा, कृष्णा हरीस्वामी, मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष सिरिमल्ला श्रीनिवास आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news