

मुंबई : पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकर्याच्या वारसाला 4 लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात 16 जूनपासून ग्रामीण आणि शहरी भागातून वारकर्यांच्या दिंड्या निघाल्या आहेत. म्हणजे, 16 ते 10 जुलैदरम्यान अपघात अथवा दुर्घटनेत मृत्यू तसेच जखमी झालेल्या वारकर्यांसाठी शासनाने मदतीची तरतूद केली आहे.
वारीदरम्यान एखाद्या वारकर्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही. याशिवाय, वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे.