मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटचे उद्या मतदान, १० जागांसाठी २८ उमेदवार

Mumbai University Senate elections | सुट्टी नसल्याने मतदानावर परिणाम होणार?
Mumbai University Senate elections
मुंबईत पावसाची बॅटींग! विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलल्या File Photo
Published on
Updated on

मुंबई : तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक (Mumbai University Senate elections) उद्या (२४ सप्टेंबर) रोजी होणार आहे. मंगळवारी शासकीय कामकाजाचा दिवस असल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे स्थगित झालेली ही निवडणूक उच्च न्यायालयाने मंगळवारी घेण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाला दिल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी पुन्हा प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे.

रविवारी मतदारांना संपर्क करणे, मतदानाचे आवाहन करणे, आदीवर सिनेटच्या उमेदवारांचा भर दिसून आला. युवासेना (उबाठा) विरुद्ध अभाविप समोरासमोर लढत आहे, तर काही जागांवर छात्रभारती, बहुजन विकास आघाडी हे गट, तर काही जागांवर अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मनसे अणि युवासेना (शिंदेगट) या विद्यार्थी संघटनेकडून उमेदवारी थेट अर्ज भरलेले नाहीत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रांवर आणि ६४ बूथवर ही निवडणूक पार पडणार आहे. एकूण १३ हजार ४०६ मतदार आहेत. मंगळवार शासकीय कामकाजाचा दिवस असल्याने मतदान करण्यासाठी कसे यायचे असा प्रश्न मतदारांना पडला आहे. मतदारांना हक्काची सुट्टी मिळाली नाही तर ते मोठ्याप्रमाणात मतदानाकडे पाठ दाखवतील. यामुळे मतदान मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी भीती या सिनेट पदवीधर उमेदवारांना सतावत आहे. (Mumbai University Senate elections)

२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत १० पदवीधरांच्या जागांकरिता ६८ उमेदवार उभे राहिले होते. या चुरसीच्या निवडणुकीत युवासेनेने बाजी मारत सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत युवासेना (उबाठा) चे दहाही जागांवर उमेदवार आहेत. या विरोधात सर्व जागांवर अभाविपचे उमेदवार रिंगणात उभे आहेत.

स्थगितीची माहिती नाही.. मतदार परतले...

रविवारी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. या स्थगितीची माहिती मुंबई विद्यापीठाने मतदारांना मेसेज पाठवून न दिल्याने नियोजित २२ सप्टेंबर या तारखेमुळे रविवारी सकाळी काही पदवीधर मतदार मतदान केंद्रावर पोहोचले होते. अनेकांनी निवडणुका पुढे ढकलल्या ही माहिती नसल्याचे सांगितले. विद्यापीठाने पदवीधर मतदारांना गृहीत धरणे कितपत योग्य आहे. निवडणुका पुढे ढकललेली माहिती देणे गरजेचे होते, अशी माहिती एका मतदाराने दिली.

मतदानाची माहिती इथे मिळेल...

विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बूथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बूथ क्रमांक पाहू शकणार आहेत. (Mumbai University Senate elections)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news