Political News: उपसभापतिपदासाठी नीलम गोऱ्हे यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी?

या किंवा पुढच्या आठवड्यात उपसभापती पदासाठी निवडणूक घोषित करण्यात येणार आहे.
neelam gorhe
neelam gorhepudhari
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: नवनिर्वाचित सदस्यांचा विधान परिषदेत शपथविधी झाल्यानंतर भाजपचे वरिष्ठ सभागृहातील संख्याबळ वाढले आहे. मात्र उपसभापतिपदाचा मान स्वतःकडे न ठेवता तो शिवसेना शिंदे गटाला द्यायचा निर्णय भाजपत झाला असल्याचे समजते.

यापूर्वी उपसभापतिपद सांभाळणाऱ्या, महिला हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव या पदासाठी समोर असल्याचे समजते. या किंवा पुढच्या आठवड्यात उपसभापती पदासाठी निवडणूक घोषित करण्यात येणार आहे.

neelam gorhe
Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana: 'कर्जमाफी नव्हे, ही कर्जवसुली योजना’; विधान परिषदेत विरोधकांची टीका

सामान्यतः सांसदीय परंपरांचे पालन करत उपसभापतिपद आणि उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना दिले जात असते. मात्र संसदेत आणि राज्यांच्या विधिमंडळात हा पायंडा आता पाळला जात नाही. अधिवेशनाची कार्यपत्रिका ठरवण्यासाठी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपसभापती पदाची निवडणूक घेण्याचे अनौपचारिकरीत्या ठरले होते. त्यानुसार आता लगेचच हा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे असे समजते.

विधानसभेत उपाध्यक्षपदाचा मान मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटाला या अगोदरच दिला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील अण्णा बनसोड विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत तर भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

आता विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रा. राम शिंदे सभापतिपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच उपसभापती पदाची संधी पुन्हा एकदा शिंदे यांच्या पक्षाला दिली जाणार आहे.

neelam gorhe
KEM Hospital Renaming: म्हणे, किंग एडवर्ड हा कसाबसारखा माणूस, म्हणून 'केईएम'च्या नामांतराचा प्रस्ताव; सत्ताधारी- विरोधकांमध्ये खडाजंगी

शिंदे गटातर्फे नीलम गोऱ्हे यांचेच नाव पुढे येणार हे निश्चित समजले जाते. ही निवडणूक फक्त केव्हा होईल एवढा तपशील ठरायचा बाकी आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार दराडे यांचा पराभव केल्यानंतरही बंडखोरी करून निवडून आलेल्या भाजपच्या जवळच्या असलेल्या गोकुळ गीते यांना शिंदे यांच्या पक्षात सामील व्हा, असा निरोप भाजपतर्फे देण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गीते या निर्णयाला अनुकूल नव्हते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना ‘शिंदे साहेब हे आपलेच आहेत. त्यामुळे त्यांना समर्थन द्या, असा निरोप दिला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

नाशिक जिल्ह्यातील या घडामोडींमुळे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या निष्ठांवर आक्षेप घेतला जात होता. स्वतः महाजन यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. गोकुळ गीते हे शिंदे गटात सामील होण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना भेटले. त्यानंतर आता कोणताही वाद उरलेला नाही. मित्र पक्षांच्या भावनांचा आदर करत आणि त्यांच्या मैत्रीची कदर करत उपसभापती पद देखील शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे सोपवले जाणार आहे.

विरोधी नेत्याचे काय?

विधान परिषदेत आता विरोधी पक्षनेता नेमला जाईल का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यातील सर्व पक्ष एकत्रितरीत्या पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकत नाही, असा संकेत यापूर्वीच्या घटनामुळे पडला आहे. मात्र विधान परिषदेत तसा नियम नसून विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी एकत्रित पत्र दिले तर विरोधी पक्षनेता नेमला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेस आणि शिवसेना उबाठा तसेच शरद पवार गट याबद्दल एकत्र येतो का ते पाहायचे आहे. २४ जून रोजी महाआघाडीची बैठक होणार असून या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news