मुंबई : गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सात वर्षांपूर्वी 27 कोटी रुपये खर्च करून वीर सावरकर पूल उभारण्यात आला आहे. मात्र, आता तो इतिहाजमा होणार आहे. हा पूल वर्सोवा- दहिसर कोस्टल रोडसाठी निष्कासित केला जाणार आहे.
कोट्यवधी रुपयांचा हा अपव्यय असून पर्यायी रस्ता तयार होईपर्यंत गोरेगावकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईकरांनी भरलेल्या कराचे हे नुकसान असल्याचा आरोप भाजपचे नेते रवी राजा यांनी केला आहे. गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा पूल उभारण्यात आला होता. यासाठी 27 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पूल तोडण्यात येणार असल्याने खर्च केलेला पैसा तर वाया जाणार आहेच, शिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत स्थानिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. वाहतुकीची कोंडी वाढणार असून प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. नियोजनाचा अभावमुळे हे मोठे नुकसान सहक करावे लागणार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.