US new drug tariff | अमेरिकेच्या नव्या औषध शुल्काने निर्देशांक घायाळ

सेन्सेक्स 733, तर निफ्टी 236 अंकांनी कोसळला
us new drug tariff market index crash
US new drug tariff | अमेरिकेच्या नव्या औषध शुल्काने निर्देशांक घायाळ(file photo)
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100 टक्के आयात शुल्क जाहीर केले आहे. त्यातच विदेशी संस्थांनी गुंतवणूक काढून घेणे सुरूच ठेवल्याने शुक्रवारी (दि. 26) सेन्सेक्स 733 आणि निफ्टी निर्देशांक 236 अंकांनी गडगडला.

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) दिवसभर झालेल्या व्यवहारात सेन्सेक्स 800 अंकांहून अधिक घसरून 80,400 अंकांच्या खाली आला होता. बाजार बंद होताना त्यात काहीशी सुधारणा झाल्याने सेन्सेक्स 0.90 टक्क्याच्या घटीसह 80,426 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 250 अंकांहून अधिक खाली आला होता. बाजार बंद होताना निफ्टी निर्देशांक 0.95 टक्क्याच्या घसरणीसह 24,654 अंकांवर स्थिरावला. सलग, सहाव्या सत्रात शेअर निर्देशांकाची घसरण झाली असून, गत सप्ताहात सेन्सेक्स 2.66 आणि निफ्टी निर्देशांक 2.65 टक्क्यांनी खाली आला आहे.

गुंतवणूकदारांनी गमावले 15 लाख कोटी

सेन्सेक्सच्या तीन अंकी घसरणीमुळे शुक्रवारच्या (दि. 26) सत्रात बीएसईतील गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी रुपये गमावले. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवसांत निर्देशांकांत घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे 15.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गत, दोन महिन्यांतील हा सर्वात नुकसानकारक सप्ताह ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news