UPSC Exam : यूपीएससीकडून पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Union Public Service Commission Exam 2026 Time Table
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पुढील वर्षात घेण्यात येणार्या सर्व प्रमुख परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरी सेवा, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांचे नियोजन करण्यासाठी 2026 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
युपीएससीने जाहीर केलेल्या मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस (आयएएस/आयपीएस) परीक्षेची अधिसूचना 14 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2026 ठेवण्यात आली आहे. त्याची प्रिलिम्स परीक्षा 24 मे 2026 रोजी होईल, तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे.
त्याच वेळी, सैन्यात करिअर करू इच्छिणार्या तरुणांसाठी, एनडीए, सीडीएस परीक्षा 2026 ची अधिसूचना 10 डिसेंबर 2025 रोजी येईल आणि दोन्हीसाठी लेखी परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होईल. त्याचवेळी, सैन्यात करिअर करू इच्छिणार्या तरुणांसाठी, एनडीए, सीडीएस-ख परीक्षा 2026 ची अधिसूचना 10 डिसेंबर 2025 रोजी येईल आणि दोन्हीसाठी लेखी परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

