मागाठाणेत ठाकरे गटाला खिंडार; दोन माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश
Two former corporators of the Thackeray group will join the Shinde group
दोन माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार.Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : मागाठाणे विधानसभा मतदार संघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील दोन माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा या शासकीय निवासस्थानी रात्री ८.३० वा.च्या सुमारांस हा पक्षप्रवेश होणार आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थित हाेणार प्रवेश

ठाकरे गटातील माजी नगरसेविका रिध्दी भास्कर खुरसंगे, त्याचे पती माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्यासह माजी नगरसेविका गिता सिंघन आणि त्यांचे पती तथा ठाकरे गटातील पदाधिकारी संजय सिंघन आदींसह कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी मागाठाणे विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचे आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित राहणार आहेत.

Two former corporators of the Thackeray group will join the Shinde group
विधानमंडळातील शिवसेना कार्यालयावर ‘शिंदे गटा’चा ताबा

ठाकरे गटाच्या बालेकिल्लात खिंडार

मागाठाणे विधानसभा मतदार संघ हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघातील ठाकरे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे हे २०१९ ला दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र; शिवसेनेच्या फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात २०२२ ला गेले. तेव्हापासून मागाठाण्यातील ठाकरे गटाचे ८ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक आमदार सुर्वे यांच्यासोबत शिंदे गटात गेले नव्हते. मात्र काही महिन्यापुर्वी माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. आता आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारी मुंबई महापालिका निवडणूकीची रणनितीसमोर ठेवून मागाठाण्यात ठाकरे गटाला राजकिय धक्के बसत आहेत. त्यामुळे मागाठाणे विधानसभा मतदार संघात आठ पैकी तीन माजी नगरसेवक हे शिंदे गटात गेले आहेत.

Two former corporators of the Thackeray group will join the Shinde group
District Bank Election : शह-काटशहाच्या राजकारणात गटा-तटाला महत्त्व

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news