मुंबई : घाटकोपरमध्ये आढळले वीस मृत फ्लेमिंगो पक्षी

Flemingo Birds Died In mumbai
Flemingo Birds Died In mumbai

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या खाडीवर येणारे गुलाबी रंगांचे फ्लेमिंगो पक्षी हे पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचे स्थान आहेत. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर घाटकोपरमधील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी (दि.२०) वीस ते तीस फ्लेमिंगो पक्षी छिन्न विच्छिन अवस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच पक्षीमित्र सुनील कदम त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिस, पक्षी मित्र या फ्लेमिंगोच्या मृत्यूचा शोध घेत आहेत. मात्र स्थानिक नागरिक आणि पक्षी मित्रांच्या मते हा फ्लेमिंगोचा थवा विमानाच्या मार्गात आला असावा आणि त्याची धडक बसून संपूर्ण थव्यातल्या पक्षांचा धडकेने मृत्यू होऊन ते खाली कोसळले असावे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा या मृत फ्लेमिंगोंची शोध घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news