FDA Fake Officer Raid: तुकाराम मुंढेच्या धाडेकाबाज अॅक्शनचा असाही परिणाम... बनावट FDA अधिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रीय?

FDA Fake Officer Raid
FDA Fake Officer Raidpudhari
Published on
Updated on

FDA Fake Officer Raid: महाराष्ट्रातील धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई करत बनावट पनीर, अन् आरोग्यास हानीकारक असे पदार्थ तयार करून विकणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन बनावट अन् भेसळयुक्त अन्नपदार्थ जनतेच्या माथी मारणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

FDA Fake Officer Raid
Kalyan Crime : तुकाराम मुंढेंबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक

मात्र तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईचा गैरफायदा काही बनावट FDA अधिकारी घेत आहेत. FDA अधिकारी असल्याची बतावणी करून हे अधिकारी हॉटेलवर धाड टाकत आहेत. बोरिवली पश्चिममधील आहार हॉटेलवर अशाच बोगस FDA अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याचे समोर आले आहे. त्यांनी हॉटेल मालकाकडे अन्नाचे नमुने तपासण्याच्या नावाखाली कारवाईची धमकी दिली. या अधिकाऱ्याने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे बनावट ओळखपत्र दाखवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

FDA Fake Officer Raid
Chandrapur Police Raid | सावलीत बनावट तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा; ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

दरम्यान, या घटनेचा हॉटेल मालकाला संशय आल्यानंतर त्याने पोलीसांकडे धाव घेतली. बनावट अधिकारी असल्याचा संशय आल्याने दोघांवर बोरिवली पोलिस ठाण्यात गन्हा दाखल झाला आहे. यात आरोपीचे नाव विजय जाधव आणि स्वाती तुळसकर असं असून त्यांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न केला.

FDA Fake Officer Raid
Pune Illegal Gutkha Seizure: काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; १.०९ लाखांचा गुटखा साठा जप्त, एकाला अटक

मंढे यांच्या धडक कारवाईच्या वातावरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या दोघांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सध्या बोरिवली पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news