

मुंबई : राज्यातील 21 पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या गुरुवारी गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी केल्या असून, तीन पोलीस उपायुक्तांची मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई शहर, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर, पुण्याच्या राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक आंचल दलाल यांची रायगड, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर, अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशकपदी, नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची बदली अकोला येथे करण्यात आली आहे.
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग विभागात, कायदा व सुव्यवस्थेचे सहाय्यक महनिरीक्षक राजतिलक रोशन यांची मुंबई, पालघरचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण, गडचिरोली अभियानचे अप्पर अधीक्षक यतिश देशमुख यांची पालघर, सिंधुदुर्गचे अधीक्षक सौरभ अगरवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, ठाण्याचे उपायुक्त मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग, बुलढाणा अधीक्षक विश्व पानसरे यांची अमरावती राज्य राखीव बलाचे समादेशक, नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक निलेश तांबे यांची बुलढाणा, सातारा अधीक्षक समीर अस्लम शेख यांची मुंबई शहर, पुणे लोहमार्गचे अधीक्षक तुषार दोषी यांची सातारा, लातूरचे अधीक्षक सोमय विनायक मुंडे यांची छत्रपती संभाजीनगर परिमंडळ एक, पुणे एटीएसच्या अधीक्षक जयंत मीना यांची लातूर, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची रत्नागिरी आणि सांगलीच्या अप्पर अधीक्षक रितू खोकर यांची धाराशीव येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.