Central Railway announcement issue : ट्रान्स हार्बरवर ‘ऐरावली’, ‘राबाडा’ स्थानके!

लोकल गाड्यांमधील विचित्र उद्घोषणांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम
Central Railway announcement issue
ट्रान्स हार्बरवर ‘ऐरावली’, ‘राबाडा’ स्थानके!pudhari photo
Published on
Updated on
मुंबई : विवेक कांबळे

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाण्याहून वाशी, पनवेलकडे जाणार्‍या लोकल गाड्यांमध्येे दिघा स्थानकानंतर “पुढील स्थानक ऐरावली” आणि “पुढील स्थानक राबाडा” अशा उद्घोषणा कानावर पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

राज्यभरात सध्या मराठीचा मुद्दा तापलेला असताना मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्येही स्थानकांची मूळ मराठी नावे अन्य भाषांमध्ये, तीही विचित्र पद्धतीने पुकारली जात असल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना पुढे येणार्‍या स्थानकांचा पुकारा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत केला जातो. मात्र, मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाण्याहून वाशी, पनवेलकडे जाणार्‍या सर्वच लोकल गाड्यांमध्येे दिघा गाव स्थानकानंतर येणार्‍या ‘ऐरोली’ स्थानकाचे नाव तीनही भाषांमध्ये ‘ऐरावली’, तर ‘रबाळे’ स्थानकाचे नाव ‘राबाडा’ असेच पुकारले जाते.

या मार्गावर दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांना या उद्घोषणांची आता सवय झाली असली, तरी नवीन प्रवाशांना मात्र पुढे नेमके कोणते स्थानक येत आहे हे समजतच नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या गंतव्यस्थानकाच्या पुढे गेल्याचे प्रकारही घडत आहेत. मराठी भाषाप्रेमींनी या उद्घोषणांबाबत नाराजी व्यक्त केली असून रेल्वे प्रशासनाने या उद्घोषणांमध्ये दुरुस्ती करून स्थानकांची नावे योग्य प्रकारे पुकारण्याची मागणी केली आहे.

रेल्वे प्रशासनात मराठी भाषिकांपेक्षा हिंदी भाषिक कर्मचार्‍यांचाच भरणा अधिक आहे. अगदी तिकीट खिडक्यांवरील कर्मचार्‍यांपासून ते आरपीएफ जवानांपर्यंत उत्तर भारतीयांचाच डंका आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मसह लोकलमधील उद्घोषणांवरही हिंदीचाच प्रभाव दिसून येतो. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

सुजीत पाटील, रेल्वे प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news